मुंबई : पावसाळ्याचे दिवस आल्यानंतर आणि पावसानं चांगला जोर पकडल्यानंतर अनेकांचीच पावलं पुणे आणि त्या नजीक्या पर्यटन स्थळांकडे वळतात. एकदिवसीय सहलीला प्राधान्य देणाऱ्या मुंबईकरांची संख्या यात तुलनेने जास्त. पण, यंदाच्या वर्षी याच पर्यटनप्रेमींना मात्र पावसाळाही घरातच व्यतीत करावा लागण्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या पावसाळ्यात तुम्हीही पुण्याच्या दिशेनं जाण्याचा बेत आखत असाल, तर आताच हा बेत बदला. कारण, खुद्द अधिकाऱ्यांनीच याविषयीच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुणे जिल्हाधिकाऱअयांकडून सोमवारी मावळ, मुळशी आणि इतर धरण क्षेत्रांमध्ये पर्यटकांनी गर्दी करु नये अशा सूचना केल्या आहेत. देशात आणि या भागात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. 


खडकवासला, पानशेत, भूशी अशी धरणं दरवर्षी पर्यटकांच्या गर्दीनं गजबजलेली असतात. उत्साहाच्या भरात अनेकदा या ठिकाणी काही गालबोट लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण, यंदा मात्र परिस्थिती बदललेली असेल. 




खुद्द जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीच ट्विट करत याबाबतचं पत्रक प्रसिद्ध केलं. ज्यामध्ये त्यांनी हा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत घेतल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरीही लोणावऴा आणि त्यानजीतच्या परिसरात आखून दिलेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामांसाठी जाण्यास परवानगी असल्याचंही त्यांनी सांगितलं.