Pune Farmer Buy Bull : हौशेला काही मोल नाही असं म्हटलं जातं. मात्र हीच हौस पुरविण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल 21 लाख रुपयांना किटली नावाच्या बैलाची खरेदी केली आहे. आता या 21 लाखांच्या किटली बैलाला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर बैलाच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतीमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल 21 लाखांना एका बैलाची खरेदी केली आहे.


वाजत गाजत मिरवणूक


एखाद्या आलिशान कारच्या किमती इतकीच किंमत आता या किटली बैलाला मिळाली आहे. पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. तसेच त्या बैलाचे स्वागतही केले. सध्या या बैलाला पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.



धावणाऱ्या बैलाची 21 लाखांना खरेदी


बैलगाडा शर्यत सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजल्याचे पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत. अशाच प्रकारे खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकऱ्याने शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलाची 21 लाखांना खरेदी केली आहे.