28 तास 25 मिनिटांनंतर संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक
28 तास 25 मिनिटांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक संपली आहे. पुण्यात गणेश विसर्जन शांतेत पार पडलं आहे.
Pune Ganesh Visarjan 2024: पुण्यातील विसर्जन मिरवणूक अखेर 28 तासांनंतर संपली आहे.शेवटच्या मंडळाच्या गणपती विसर्जन बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास करण्यात आले. त्याचबरोबर मिरवणूक शांततेत पार पडल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पोलिसांनी विना अडचण मिरवणूक पार पडली...मोठ्या प्रमाणावर नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितलंय. लेझरच्या वापरावर बंदी होती तरीही ज्या मंडळांनी लेझरचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं अमितेश कुमार यांनी सांगितलंय...तसेच आवाजाच्या तीव्रतेचं उल्लंघन केलं असल्यासही कारवाई करण्यात येणार असल्याचं ते म्हणालेत...मोबाईल चोरीच्याही घटना घडल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
पुण्यात बंदी असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन
पुण्यात बंदी असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करण्यात आलंय. उल्लंघन करणा-या मंडळावर कारवाई करण्यासाठी 126 व्हॉईस लेव्हल मीटर टीम तैनात करण्यात आलीय. ज्याठिकाणी डीजेचा आवाज जास्त आहे त्या मार्गावर पथकाकडून कालपासून आवाजाची तपासणी करण्यात येत होती. पुणे उपनगरातीलही गणेश मंडळांच्या मिरवणुकीदरम्यान आवाजाची तपासणी करण्यात आली.
त्यामुळे आता पुणे पोलीस किती मंडळांवर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणारेय.
तब्बल 24 तासांनंतर लालबाग राजाला निरोप
मुंबईतल्या लालबागची शान असलेल्या लालबाग राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. तब्बल 24 तासांनंतर लालबाग राजाला निरोप देण्यात आला. काल सकाळी १० वाजता लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती २४ तासांनंतरही गणेश भक्तांची अलोट गर्दी लालबाग राजाच्या मिरवणुकीत दिसून आली. गिरगाव चौपाटीवर जिथे पाहावं तिथे गणेशभक्तच दिसत होते. इतक्या तासांनंतरही गणेश भक्तांचा उत्साह जराही कमी झालेला दिसला नाही. जल्लोषात...ढोलताशांच्या गजरात....गुलालाची उधळण करत आणि लालबाग राजाच्या घोषणांनी गिरगाव चौपाटीचा परिसर दुमदुमुन गेला होता....'पुढच्या वर्षी लवकर या' अशी इच्छा गणेशभक्तांनी बाप्पाकडे आवर्जून व्यक्त केली.