तिला भेटायचे असेल तर...; पतीनेच फेसबुकवर पत्नीचे न्यूड फोटो टाकले अन् लोकेशनही दिले
Husband Upload Wifes Nude Photo On Facebook : पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल पत्नीच्या न्यूड फोटोसह फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्या पतिविरोधात गुन्हा दाखल
Husband Upload Wifes Nude Photo Pune: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वतःच्या पत्नीचे न्यूड फोडो सोशल मीडियावर पोस्ट केले. इतकंच नव्हे तर फोटोवर अश्लील कमेंटही केली. हा सगळा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच तिच्या पायाखालची जमिन हादरली. या प्रकरणी पोस्ट टाकणाऱ्या पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune Crime News)
विकृत पतीने स्वतःच्या पत्नीचे फेसबुकवर न्यूड फोटो अपलोड केले. तसंच, पोस्टमध्ये माझ्या बायकोला भेटायचे असेल तर लोकेशन वर जा, असंही त्याने लिहलं होतं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पत्नीला पतीच्या कृत्याबाबत कळताच तिने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
35 वर्षीय पत्नीने या प्रकरणी पतीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार 40 वर्षीय आरोपीविरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी. की आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. आरोपी पतीने फिर्यादी पत्नीचे न्यूड फोटो फेसबुकवर अपलोड केले आणि कोणाला माझ्या बायकोला भेटायचे असेल तर लोकेशन वर जा असे पोस्टमध्ये नमूद केले होते. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादी आणि तिच्या आईकडून वेळोवेळी सात लाख रुपयेदेखील घेतले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या पतीला बाहेर त्याचं कोणत्या मुलीसोबत अफेअर आहे अशी विचारणा केली. यावर संतापात्या भरात पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. तर, ऑंटी अब मुझे तुझमे इंटरेस्ट नही रहा, असे बोलून हाताने मारहाण केली. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
पुण्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता
लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षे तरुणीला सैफ नावाच्या तरुणाने पळवून नेले होते. मात्र पळून गेल्यानंतर प्रियकर विवाहित असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आपण परत येत असल्याचे आपल्या मैत्रीणीला फोन करून सांगितले. तसेच तिचे लाइव्ह लोकेशनसुध्दा पाठवले होचे. मात्र ही तरुणी अद्यापही परतली नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी तिला पळून नेले आहे. चंदननगर पोलिसांनी सैफ (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तरुणीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.