Pune News: पुण्याच्या विविध भागात कोयता गँगनं (Koyata Gang) दुकानदारांना सळो की पळो करून सोडलंय. त्याची काही थरकाप उडवणारी दृष्य समोर (Koyata Gang Video) आली होती. तापकीर गल्लीतील मार्केटमध्ये हातात कोयते घेऊन चौघांच्या टोळक्यानं दुकानांची अशी तोडफोड केली. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात नक्की चाललंय काय? कायदा आणि सुव्यवस्थेचे (Pune Crime) तीन तेरा वाजलेत की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. अशातच या गँगला कोयते पुरवणाऱ्या एका दुकानदाराला अटकही करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध भागात गुन्हेगारीनं असं डोकं वर काढलंय. गावगुंडांनी, विशेषतः कोयता गँगनं एवढा धुमाकूळ घातलाय की, पोलिसांच्या (Pune Police) नाकी नऊ आलंय. मावळमधील चांदखेड इथल्या यात्रेमध्ये गावगुंडांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळं यात्रेत दहशतीचं वातावरण निर्माण झालं. अखेर पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार शोधमोहीम सुरू केली. हॉटेल, लॉज, एसटी डेपो, रेल्वे स्थानक परिसरात रात्रभर कोंबिंग ऑपरेशन केलं. 


पोलिसांनी नामचीन गुंडांची (Pune Police Raid) झाडाझडती घेतली. तब्बल 3,765 गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. त्यात 698 गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचं आढळलं. या गुंडांकडून पिस्तुलं, काडतुसं, 185 कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. याच झाडाझडतीत कोयता गँगचा म्होरक्या बिट्ट्या कुचेकर (bittya kuchekar) पुणे पोलिसांच्या हाती लागला.


आणखी वाचा - Crime News : गंमतीगंमतीत प्रेयसीचा खेळ खल्लास; प्रियकराने रचलेला बनाव पाहून पोलिसही सुन्न


दरम्यान, बिट्ट्यासह त्याचा साथीदार साहिल शेख (Sahil Sheikh) आणि आकाश कांबळेलाही (Akash Kamble) अटक करण्यात आली. कोयता गँगविरोधातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जातेय. बाहेरगावाहून पोटापाण्यासाठी पुण्यात आलेल्या लोकांमुळं गुन्हेगारी (Pune Crime Rate) वाढल्याचं पोलीस सांगतात. या सगळ्या घटना लक्षात घेतल्या तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) असलेलं पुणं आता क्राईम कॅपिटल (Crime Capital) बनायला सुरूवात झाली का?, असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे.