बिबट्याचा पुन्हा दुचाकीस्वारांवर हल्ला, संतप्त ग्रामस्थांची `ही` मागणी
हल्ल्याच्या या वाढत्या घटनांमुळं परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे बिबट्याने पुन्हा दुचाकीस्वारांवर हल्ला केल्याची घटना घडलीय. घोडेगाव-जुन्नर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांवर हल्ला करून तीन जणांना जखमी केले आहे. आदिनाथ शिंदे, सौरभ सैद, संतोष डोंगरे हे तिघे मोटार सायकलवर वरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. या तिघांना उपचारासाठी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
ग्रामस्थ संतप्त
दोन दिवसा पुर्वी ही याच भागात बिबट्यांने दोघांवर हल्ला केला होता, तसेच मागील महिन्यात याच परिसरात १२ दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ले केले होते.
बिबट्याच्या हल्ल्याच्या या वाढत्या घटनांमुळं परिसरातील नागरीक भयभीत झाले आहेत.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.