मुंबई : 'पुण्यातील विश्रांतवाडीतील विश्रांत सोसायटीत रहाणारे शिंदे कुटुंबांना सध्या सुखद धक्का बसलांय. अंशिका शिंदे या तीन वर्षाच्या लहान मुलीचा एक व्हिडीयो व्हायरल झाला. या व्हिडीयोत तीने लाँकडाऊन दरम्यान आईने सांगितलेल्या सुचनांचं उल्लंघन केलं. त्यानंतर तीच्या आईने तीला सुचनांचं पालन करण्यासाठी दम दिला होता. त्यावेळी छोट्या अंशिंकाने रडत आपण पुन्हा अशी चूक करणार नाही असं सांगितलं.

 

मात्र माय लेकींच्या या संस्कार शिकवणीत अंशिकाच्या आईने अंशिकाला थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय सुचना केल्यात आणि त्यांचं कसं पालन करायचं याची आठवण करून दिली. यावेळी छोट्या अंशिकाने आपण मोदींचं आणि उद्धव काकांचं एैकणार असं सांगितलं. तसेच आपल्याला उद्धव काका खूप आवडतात असंही तीने आपल्या आईला सांगितलं. छोट्या अंशिकाचा हा व्हिडीयो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पर्यंतही पोहचला.

त्यानंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या छोट्या चहातीला फोन करून सुखद धक्का देत दिलासा दिला. आणि आई-बाबांच्या सुचनांचं पालनही करायला सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वसामान्य नागरिकांशी कसं विश्वासाचं नातं जुळलंय हेच या व्हिडीयो आणि आँडियो क्लिपवरून दिसून येतं. ('जगात भारी' महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री सज्ज)