Pune Karagruh Police Bharti 2024:  पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पुण्यामध्ये मेगा पोलीस भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी मिळणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण झालेले अनेक तरुण पोलीस बनण्याच्यादृष्टीने तयारी करत असतात. त्यासंदर्भातील पुस्तके, फिटनेस अशा बाजुने मुलांचे प्रयत्न सुरु असतात. दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरतीच्या अर्जाची लिंक खुली झाली आहे. 5 मार्चपासून उमेदवारांना येथे अर्ज करता येत आहे. उमेदवार त्यांना हव्या असलेल्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी अर्ज करु शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पुणे पोलीस विभागात एकूण 513 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह शिपाईची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकूण 513 पदांसाठी ही भरती केली जात आहे. यासाठी अर्ड करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 


वयोमर्यादा 


पुणे कारागृह पोलीस विभाग अंतर्गत भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 29 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागावर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 33 वर्षे आहे. 


खोटी माहिती देऊ नका 


शारीरिक चाचणी, लेखी परिक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी असे वैद्यकीय चाचणी हे पोलीस भरतीचे टप्पे असतील. यामध्ये चांगले गुण मिळवणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. उमेदवारांनी स्वत:बद्दलची कोणती माहिती लपवू ठेऊ नये. तसेच माहितीची खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास नोकरी गमवावी लागेल तसेच कारवाईलादेखील सामोरे जावे लागू शकते, याची नोंद घ्या. 


ऑनलाईन अर्ज 


पुणे कारागृह पोलीस विभाग भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट  mahaprisons.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.ऑफलाईन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण अर्ज भरल्यास तो बाद ठरवण्यात येईल, याची नोंद घ्या. 


अर्जाची शेवटची तारीख 


31 मार्च ही पोलीस भरतीची शेवटची तारीख आहे. या मुदतीनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्या.