पुणे : पुणे मेट्रोचे कोच पुण्यामध्ये पोहचल्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्टेशनवर या कोचची विधिवत पूजा करत स्वागत करण्यात आलं. मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली. या वेळी मेट्रोच्या तीनही कोचला फुलांनी सजवण्यात आलं होतं. नवीन वर्षात पुणेकरांना मेट्रोची भेट मिळणार आहे. पुणे मेट्रोचा कोच नेमका आहे कसा याची उत्सुकता पुणेकरांमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झालेले मेट्रोचे डबे सोमवारी रूळावर आणण्यात आले. पिंपरीतील या मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. यावेळी ही नवी मेट्रो पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. या नव्या मेट्रोची नागरिकांमध्य़े प्रचंड उत्सुकता दिसत होती. लोकं मोबाईलमध्ये या नव्या मेट्रोचे फोटो टिपण्यासाठी गर्दी करत होते.



याआधी जेव्हा मेट्रोचे हे डबे पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाले तेव्हा त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ डिसेंबरला पुणे मट्रोच्या कोचचे अनावरण केले होते.



मेट्रोचा हा डबा 40 टन वजनाचा असून 20 मीटर लांब आहे. इतर मेट्रोचे डबे देखील लवकरच रुळावर येणार आहेत. त्यामुळे २०२० या नवीन वर्षात पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.