कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिचंवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड कारांचे मेट्रोचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मेट्रो प्रयत्नशील आहे. पण त्याच बरोबर रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ नये या साठी नागरिकांनी मेट्रो स्टेशन पर्यंत सायकल ने प्रवास करावा असं आवाहन मेट्रो कडून केले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी आज पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात फुगेवाडी ते संत तुकाराम नगर या मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो ची विशेष चाचणी घेण्यात आली. त्यासाठी मेट्रो मध्ये मेट्रोचे सीईओ ब्रिजेश दिक्षित यांनी सायकल सह मेट्रोचा प्रवास केला. या वेळी अनेकांनी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला.  या वर्ष अखेर पर्यंत पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होईल असं दीक्षित यांनी या वेळी स्पष्ट केले.  


फुगेवाडी ते मेट्रो अंतर 3 किलोमीटर आहे. मेट्रो सीईओ ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो स्टेशन पासून एपीजे अब्दुल कलाम उद्यानापर्यंत 1.2 किलोमीटर अंतर सायकलवर पूर्ण केले. त्यानंतर ते पुन्हा संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन ला सायकलने  पोहचले.