भाजप नेते गिरीश बापट यांचा आमदारकीचा राजीनामा
पुण्याचे आमदार गिरीश बापट यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई : पुण्याचे आमदार गिरीश बापट यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गिरीश बापट हे पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. ते खासदार झाल्याने त्यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा आज राजीनामा दिला. बापट हे आता लोकसभेचे सदस्य झाले आहेत.
गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री होते. लोकसभा २०१९ची लोकसभा निवडणूक लढविली. त्यांनी काँग्रेसचे उमेदार मोहन जोशी यांचा पराभव केला. बापट हे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री होते. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये संसदीय मंत्री होते.
दरम्यान, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विखे-पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विखे-पाटील यांच्या प्रवेशाला दुजोरा दिला आहे. त्यांचा प्रवेश येत्या काही दिवशात होईल, असे संकेत दिले आहेत.