पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण झाल्याच्या घटनेचे पडसाद आज पुणे महापालिकेत उमटले. महापालिकेतले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काम बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणेकरांनी आम्हाला महापालिकेवर निवडून दिले आहे. पुणेकरांची कोणी लूट करणार असेल तर, आम्ही त्याविरोधात आवाज उठवणाराच. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर याच्याशी भ्रष्टाचारावर संबंधित प्रकरणी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना ती भाषा समजली नाही. त्यामुळे त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र 
यांच्यावर आहे. 


अधिकारी आणि सत्ताधारी यांनी मिळून खोटा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधारी यांचा भ्रष्टाचार आणि दडपशाही या विरोधात रसत्यावर उतरून आंदोलन करु, असे धंगेकर यांनी म्हटले आहे. एकीकडे पुणेकरांना पिण्यासाठी पाणी नाही. आणि दुसरीकडे तलावातील जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधीचे टेंडर काढली जातात, यातच अधिकारी आणि सत्ताधारी यांचा खोटारडेपणा उघड होतो, अशी टीका त्यांनी यावेळी केली.