पुणे : आता बातमी तुमच्या कामाची आहे. ही बातमी पुणे नाशिक आणि अहमदनगरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुणे नाशिक प्रवासाला वेळ लागत होता. तो वेळ आता कमी होणार आहे. अवघ्या पावणे दोन तासांत हा प्रवास शक्य होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमी हायस्पीड ट्रेनसाठी रेल्वे लाईनचं काम लवकरच सुरू होणार आहे. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचा महारेलचा मानस आहे. त्यासाठी नुकताच 102 पैकी 85 गावांमधील भू संपादनासाठी लागणाऱ्या जामीनंचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. 



पुणे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील गावांमध्ये जमीन संपादन होार आहे. या प्रकल्पातून 25 हजार नोक-या निर्माण होतील असा अंदाज आहे. यासोबत आता पुणे-नाशिक-नगर प्रवासाचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला केव्हा सुरुवात होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.