किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : सुजय विखे यांचं प्रकरण गंभीर आहे. सुजय विखे यांच्यावर कारवाई करायला आदेश दिले आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. कात्रजमध्ये कोव्हीड केअर सेंटरचे उदघाटन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुजय विखे यांच्याकडे रेमडिसिव्हीर आहे असं कळलं असतं तर लोकांना त्यांचा नंबर दिला असता असे ते म्हणाले. 19 एप्रिल रोजी सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरुन रेमडीसिवीर आणून आपल्या मतदार संघात वाटले होते. यानंतर हा मुद्दा वादाचा बनला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने पहिल्या लाटेपेक्षा आता जास्त काम केलंय. रेमडिसिव्हीर किती लागणार हे अभिप्रेत नव्हतं. ऑक्सिजन गरज आता लवकर भासायला लागलीय म्हणून ही विपरीत परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात 12 कोटी लोकसंख्या आहे. हळूहळू लसीकरण वाढवलं तर परिस्थिती आटोक्यात येईल .लसी उपलब्ध व्हायला पाहीजेत असे ते म्हणाले. 


राज्याला जगात काहीही खरेदी करण्याचा अधिकार आहे.परकीय चलन उपलब्ध करता येतं. सिरमची लस राज्याला मिळणार आहे. मोफत लसी चा निर्णय मुख्यमंत्री घेतील. लसीकरणावर राज्यात गोंधळ नाही. नवाब मलिक यांनी भूमिका मांडली ती आमची भूमिका आहे.लस उपलब्ध होत नाही म्हणून यंत्रणेची नाकी नऊ होतायत, लस मिळाली की सगळं व्यवस्थित होईल असेही ते म्हणाले. 



निवडणूकित रुग्णांची संख्या वाढली हे आहेच. यासदंर्भात मद्रास कोर्टाने बरोबर सांगितलं. ममता यांची चार वर्षे वाढली असती बाकी दुसरं काही नाही. ममता याच निवडून आल्या असत्या असे ते म्हणाले. तसेच पंढरपूर मध्ये आमचाच उमेदवार निवडून येईल असेही ते म्हणाले. 


अजित दादा म्हंटले ते बरोबर आहे. लोक निवडणुकीत जमलेत म्हणून कोरोना पसरला. निवडणूक आयोगाने हट्ट केला म्हणून हे सगळं घडल्याचे ते म्हणाले. 
दादांबद्दल कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. चंद्रकांत दादा काय बोलताय हे महत्वाचे नाही. ते बोलायचं म्हणून बोलतायत. पुण्याच्या लोकांनी निवडणून दिलं म्हणून चंद्रकांत पाटील काहीतरी बोलून दाखवताय. कोल्हापूरचे आहोत, पुण्यात काहीतरी करतोय असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला पाटलांनी लगावला. 


फडणवीसांवर मला टीका नाही करायची पण भाजप उघड पडलं आहे. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून ऑक्सिजन मिळतोय. ओरिसामधून ऑक्सिजन आणा असं सांगतायत. पण  एवढ्या दूरवरून कसं शक्य आहे ? इतके टँकर नाहीये ? वाटप योग्य व्हायला हवं असे ते म्हणाले. 


पुणे महानगरपालिकेने सेंटर ला परवानगी द्यायला पाहिजे. ऑक्सिजनची खात्री झाली तर सेंटर सुरू करावे. डॉक्टर आणि इतर सुविधा चांगली आहे याचं निश्चित व्हायला हवी असे पाटील म्हणाले.