पुणे :  डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात महिला आंदोलन करत आहेत. गॅस दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.  त्यात नुकतच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन जागरण गोंधळ आंदोलन केलं.  केंद्र सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील स्वारगेट चौकात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सहभाग घेतला होता.



पेट्रोल डिझेलचे दर एकीकडे उच्चांग गाठत आहेत. त्यामुळे गृहिणींपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्याच्या झळा बसल्या आहेत. यापाठोपाठ गॅसचेही दर वाढल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं आहे. या आंदोलनातून गॅस सिलेंडर मध्ये झालेल्या दरवाढ कमी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.