सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Pune Crime News: महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हणून म्हणवलं जातं. मात्र, गेल्या दिवसांपासून अंधश्रद्धेतून घडणाऱ्या गुन्ह्यांचीही वाढ झाली आहे. 21 व्या शतकात जिथं विज्ञानाचे गुणगान केले जात आहे. त्या युगात देखील करणी तसेच जादूटोणासारखे प्रकार घडताना पहायला मिळत आहे. पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. उच्चभ्रू असलेल्या कोथरूड तसेच जनवाडी इथं एक धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune Live News)


प्रॉपर्टीच्या कारणावरून आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी घरातील महिलेची साडी चोरून साडीच्या बाजुला अंडी टाचण्यालावलेले लिंबू, भात, प्राण्याचे काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणीसाठी जादूटोण्याचा अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याची घटना घडली आहे.


याबाबत अनिकेत सुपेकर यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून त्यानुसार कांता सुरेश चव्हाण वय 70, गिरीश सुरेश चव्हाण वय 35, संगीता सुपेकर वय 45, स्वप्नील सुपेकर वय 23, सोनल प्रवीण सुपेकर वय 30, देवरुशी स्वप्नील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय घडलं नेमकं?


याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगनमत करून कट रचून प्रॉपर्टीच्या कारणावरून तसेच फिर्यादी यांच्या वस्तीतील मुलगा कृष्णा चांदणे याने त्याचे पत्नीच्या कारणावरून फिर्यादीचे मामा यांना मारले होते. याचा राग मनात धरून महिलेच्या आईची साडी चोरली होती. 


त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर करणी करण्याचा कट रचला होता. त्यासाठी आईची साडी तसेच फिर्यादीची आई सुनिता सुपेकर, मावशी अनिता चव्हाण, काकु आशा सुपेकर व कृष्णा चांदणे याचे फोटो ठेवुन फोटोचे व साडीचे बाजुला अंडी, टाचणे लावलेले लिंबू, भात कसले तरी काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती ठेवुन करणी करता जादू टोण्याचे अनिष्ट व अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.