Dead Rat In Ice At Pune: उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णता कमी व्हावी यासाठी थंड पेये प्यायली जातात. ज्यूस, कोकम सरबत असो किंवा लिंबू सरबत थंडावा मिळावा यासाठी त्यात थोडा जास्तीचा बर्फ टाकून पितात. तुम्हीदेखील हॉटेलमध्ये किंवा गाडीवर थांबून थंड सरबत पित असाल, तर ही बातमी वाचाच. पुण्यात बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर सापडल्याचे समोर आले आहे. बुधवारी जुन्नर येथील एका आइस फॅक्ट्रीतून आलेल्या बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune News Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. बर्फाच्या लादीत बर्फ सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात शीतपेयाचे सेवन केले जाते. अशावेळी दुषित बर्फ वापरला गेला असेल तर नागरिकांच्या आरोग्यांचे काय? नागरिकांना काही झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


बर्फ बनवण्याच्या फॅक्टरीत मोठ्या प्रमाणात बर्फ तयार केला जातो. या बर्फ हॉटेल, व्यावसायिक किंवा छोट्या प्रमाणात व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना पुरवला जातो. निघोज येथील एका आइस फॅक्टरीतून बर्फ विक्रीसाठी येतो. हा बर्फ जिथे साठवून ठेवण्यात येतो तिथेच हा उंदीर त्यात सापडल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे. उंदीर आढळल्यानंतर बर्फ फेकून देण्यात आला, असल्याचेही विक्रेत्यांनी म्हटलं आहे. 


बर्फात उंदीर सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बर्फाचा दर्जा आणि बर्फ बनवण्यासाठी कोणते पाणी वापरण्यात येते. त्याचा दर्जा तपासण्यात येतो का? या सारखे प्रश्न ऐरणीवर आले आहेत, बर्फाच्या पुरवठा प्रामुख्याने बर्फाच्या कारखान्यातून होतो हे कारखाने शहराच्या बाहेर असतात. बहुतांश कारखान्यातील बर्फाचा दर्जा अन्न आणि औषध प्रशासनाने तपासला आहे का? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. 



उन्हाळा सुरू झाल्यानंतर बर्फाची मागणी वाढली आहे. त्यामुळं अशावेळी दुषित पाण्याचा वापर करुन बर्फाचा पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तसंच, दुषित बर्फ खाल्ल्याने मानवी आरोग्याला व लहान मुलांना संसर्ग होण्याची किंवा आरोग्याला त्रास होऊ शकतो, बर्फात उंदीर सापडल्यानंतर हे सारे प्रश्न चिंतेत भर टाकत आहेत. त्यामुळं अन्न व आरोग्य प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.