पुण्यात गणेशोत्सव काळात `या` दिवसात दारू विक्रीला बंदी...तर रत्नागिरीतही 3 दिवस ड्राय डे
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, कठोर कारवाई केली जाणार
Pune News : पुणेकरांसाठी आताची मोठी बातमी समोर येतेय. पुण्यात गणशोत्सव काळात 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही ज्या भागात गणेश विसर्जन असणार त्याभागातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा आदेश जारी केला आहे. यासाठी अशा दुकानांवर वॉचही ठेवला जाणार आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होतोय. या काळात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मद्यविक्री करणारी दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार लक्ष ठेवलं जाणार आहे. बेकायदा कामास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पथकांमार्फत अचानक तपासणी केली जाणार आहे. मद्यनिषेध अधिनियम 1949मधील नियम 142अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात अशाप्रकारचे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार पत्रक काढण्यात आलं आहे.
बंदचा कालावधी आणि बंदचे क्षेत्र
31 ऑगस्ट – पूर्ण पुणे जिल्हा
09 सप्टेंबर – पूर्ण पुणे जिल्हा
10 सप्टेंबर – पुणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री अनुज्ञती, विसर्जन मिरवणूक संपेपर्यंतच्या कालावधीकरिता
गणेशोत्सवाचा 5वा आणि 7वा दिवस (संपूर्ण दिवस) – ज्या भागांत पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते, अशा भागात नियम लागू राहणार आहे.