पुणे : Pune News : येथील आंबील ओढा (Ambil Odha ) परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असताना जानेवारी महिन्यात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाला. त्यानंतर या कारवाईवर टीका होऊ लागल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, पुन्हा आंबील ओढ्यावरुन राडा होण्याची शक्यता आहे. कारवाईबाबातची स्थगिती उठविण्यात आली आहे. ( Protests mark Ambil Odha anti-encroachment drive )


पुन्हा आंबील ओढ्यावर बुलडोझर ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालिका न्यायालयाने स्थगिती उठवल्याने आता कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. बांधकाम हटविण्यावर स्थगिती होती. मात्र, आता महापालिकेकडून पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आंबील ओढा येथील नागरिक आणि प्रशासनात राडा होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा न्यायालयात स्थानिक धाव घेणार आहेत. या कारवाईला स्थानिकांचा विरोध कायम आहे. आम्हाला न्याय मिळालाय पाहिजे अशी स्थानिकांनी भूमिका घेतली आहे.



याआधी करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी आंबील ओढ्यावरील नागरिक आक्रमक झाले होते. आंबील ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. त्यावेळी याचे मोठे पडसाद उमटले होते. नागरिकांनी तुफान राडा केला होता. याचदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली होती. जर पुन्हा कारवाई केली गेली तर राडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


आंबील ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट होत असताना काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला होता.