बेफामपणे गाडी चालणाऱ्या तरुणाने महिलेला उडवलं, अपघाताचा थरारक VIDEO VIRAL
Pune Accident Video : परिसरातून निर्भय निर्धास्तपणे महिला जात होती, अचानक भरधाव वेगाने बाइक चालक आला आणि त्याने महिलेला उडवलं...
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : रस्त्यावरुन चालणंही आता गुन्हा झाला आहे का, असाच प्रश्न पडतोय. भरधाव गाडी चालकांमुळे अनेक शहरामधील परिसरात भीतीचं वातावरण आहे. रस्त्यावरुन चालणे, धावणे अजून जीवघेणा प्रवास ठरतोय तोही या बेफामपणे गाडी चालणाऱ्या लोकांमुळे...मुंबईत राजलक्ष्मी रामकृष्णन (Rajalakshmi Ramakrishnan) यांचा कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला होता. आता पुण्यात एका भरधाव बाइकचालकाने महिलेचा जीव घेतला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहेत. (Pune Accident CCTV )
कर्वेनगर परिसरात बेफामपण गाडी चालवणाऱ्या तरुणाने महिलेला उडवलं. त्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात अरुंद गल्लीतून महिला जात असताना समोरुन भरधाव वेगाने बाइकस्वार आला आणि त्याने महिलेला धडक दिली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. (pune news road accident Rash Bike Driving Women Accident cctv video viral)
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांने तरुणाने कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंगणे होम कॉलनीमध्ये बेफामपणे वाहन चालक, सायलेन्सर, कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिक त्रस्त आहेत. या चालकांवर कारवाई करण्याची मागणीही त्या रहिवाशांनी केली आहे. अनेक वेळा तरुण या रस्त्यावर गाड्यांची स्पर्धा लावतात त्यामुळे परिसरात अशा वाहनचालकामुळे भीतीच वातावरण आहे.
थरार व्हिडीओ
काही दिवसांपूर्वीच श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते समीर वसवे यांच्या आई रंजना प्रकाश वसवे यांचं अशाच बेभान गाडी चालकामुळे बळी गेला आहे.
अपघात टाळण्यासाठी याच्यावर ठोस अशी उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, अशी नागरिकांकडून मागणी होते आहे. त्याशिवाय जनजागृती करणे, ठीक ठिकाणी बोर्ड बॅनर लावणे ही काळाची गरज आहे. महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणं जरी अडचणीचे ठरणार असलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे विना विलंब स्पीड ब्रेकर करण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.