पुणे : पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार एका सुरक्षा रक्षकाने केला आहे. या प्रकरणी २६ वर्षीय सुरक्षा रक्षक अशोक तुकाराम चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा रक्षकाविरोधात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, महिला आयबी गेस्टहाऊसमध्ये अंघोळ करीत होत्या. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षक अशोक तुकाराम चव्हाण हा बाथरुमच्या खिडकीजवळ आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बाथरुमच्या खिडकीतून मोबाईने चित्रिकरण


खिडकीजवळ चढून त्याने खिडकीतून  मोबाईल कॅमेऱ्यातून महिलांचे व्हीडिओ आणि फोटो काढले. हा प्रकार इतर महिलांच्याही लक्षात आला. यानंतर आरडा ओरड झाली आणि सुरक्षा रक्षकाला पकडण्यात आले.


विशेष म्हणजे पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये ही घटना घडली, या प्रकरणी महिलांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. एकंदरीत पुण्यात बाथरुम, बेडरुम, घराच्या खिडकीत कॅमेरा लावण्याचे प्रकार आणि जागृक नागरिकांकडून त्याविषयी तक्रार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी मोबाईल आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा गैरप्रकारही समोर येत आहे.