Villages in Pune : पुण्यातील 32 गावांमध्ये लागलेले बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. गाव विक्रीही ही बॅनरबाजी आहे. गाव विकणे आहे. अशा प्रकारच्या जाहिरातीचे बॅनर  पुण्यातील 32 गावांमध्ये लागले आहेत.  महापालिकेच्या आवाजवी कर धोरणात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे महापालिकेचा जुलमी कर भरू शकत नसल्याने आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे. यासाठी 32 गावांच्या माध्यमातून "गाव विकणे आहे" अशा प्रकारच्या जाहिराती गावोगावी लावण्यात येऊन पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 
महापालिकेने कोणत्याही सुविधा न पुरवता,टॅक्स मात्र भरमसाठ लावलेला आहे अशा पार्श्वभूमीवर "आम्ही टॅक्स भरू शकत नाही,तुम्ही आमचे गावच विकत घ्या."अशी भूमिका ३२ गावातील ग्रामस्थांनी घेतलेली आहे. टॅक्स या विषयावर ३२ गावातील नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी पुढील मोठ्या आंदोलनाची तयारी होताना दिसत आहे. सध्या धायरी, नऱ्हे, आंबेगाव किरकटवाडी, नांदोशी,खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे या गावात सर्वत्र बोर्ड लागल्याचे दिसत आहेत. 


बीडमध्ये 140 गावांचा नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा 


बीड जिल्ह्यातील सिंदफणा काठच्या 140 गावांसाठी नाथसागरातील पाणी सोडावे या मागणीसाठी गावोगाव बैठकांचे आयोजन केले जात आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजी नगर मध्ये याच प्रश्नावर उपोषण देखील करण्यात आले असून आता शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाणार आहे. त्यानंतरही या प्रश्नावर कुठलीही सकारात्मक हालचाल कार्यवाही न झाल्यास थेट रस्त्यावर उतरून पन्नास हजार गावकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देखील या समितीने दिलाय. पैठण येथील नाथसागरातील पाणी अंडरग्राउंड पाईपलाईन द्वारे सिंदफणा नदीपात्रात सोडल्यास 140 गावांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. यासाठी 30 किलोमीटरची पाईपलाईन करणे गरजेचे असून याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा या मागणीसाठी हा लोकलढा उभारला जातोय.