Pune News Today: पुण्याच्या राजगड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका टॉवरवर चढून तारांची चोरी करताना मृत्युमखी पडलेल्या मित्राला इतर दोघा मित्रांनी त्याच ठिकाणी पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसवराज पुरंत मॉगनमनी असे मृत तरुणाचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजगड तालुक्यातील दुर्गम डोंगरी पाबे परिसरात तिघे विजेच्या तारांची चोरी करण्यासाठी गेले असताना त्यातील एक जण चोरी करताना मृत्यूमुखी पडल्यानंतर, त्याला तिथेच डोंगरी भागात पुरून त्याच्या इतर दोघा साथीदारांनी पळ काढल्याची घटना घडली आहे. 


बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलैला सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल दिली होती बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांनी तपास केल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बसवराजचे साथीदार आरोपी रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून सिंहगड आणि वेल्हे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


नक्की काय घडलं?


गेल्या महिन्यात १३ जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे आणि सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे (ता. राजगड) येथे असलेल्या महाविज वितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या तारांची चोरी करण्यासाठी रात्री गेले होते. बसवराज हा टॉवरवरून चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापताना दिडशे फुट खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचे साथीदार रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे (दोघे राहणार पाबे, ता. राजगड) यांनी पाबे डोंगरात पुरून ठेवला असल्याची माहिती गुरुवारी मध्यरात्री रात्री वेल्हे पोलीसांना समजली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा सिंहगड रोड पोलिस आणि वेल्हे पोलिसाचे पथक आरोपीनां घेऊन घटनास्थळी दाखल झाले.


यापुर्वीही रांजणे पाबे घाट, राजगड, वेल्हे परिसरात वीजेच्या टॉवरच्या तांब्याच्या किंमती तारांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत महाविज वितरण कंपनीने पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहे. तसेच यापुर्वी तारांच्या चोरी प्रकरणी चोरट्यांना पोलिसांनी अटकही केले आहे. असे असले तरी तारांच्या चोरीचे प्रकार सुरू असल्याचे या घटनेवरून गंभीर चित्र पुढे आले आहे.