लिफ्ट देऊन एकांतात नेलं, स्वत:चे कपडेही काढून 60 वर्षांचा म्हातारा म्हणाला - ‘तुला पाहताच…’
Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 60 वर्षांच्या व्यक्तीने 45 वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६० वर्षांच्या व्यक्तीने एका महिलेसोबत गैरवर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडी परिसरातील एका गोडाउनमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोविंद सिंह रंधावा असं आरोपीचे नाव असून तो संगमवाडी येथील रहिवाशी आहे. (Pune News Today)
आरोपी आणि तक्रारदार महिला दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते. पीडित महिला खडकी येथील रहिवाशी आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन, १७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. आरोपीने तिला रेशनचे तांदुळ देण्याचे आश्वासन केले होते. त्यामुळं ती त्यांच्यासोबत जायला तयार झाली होती. मात्र, तिथे पोहोचताच त्याने तिच्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत महिलेला रेशनचे तांदूळ देण्याचे आश्वासन दिले होते. ते तांदूळ ती तिच्या पाळीव कुत्र्यांना देण्यासाठी वापरणार होती. तांदूळ घेण्यासाठी म्हणून ती त्याच्यासोबत बाइकवरुन पोरवाल रोड येथील गोडावूनमध्ये गेली. त्यावेळी गोडावूनमध्ये आरोपी आणि पीडिता दोघेच होते. या संधीचा फायदा घेत आरोपीने गोडावूनचा दरवाजा आतून लॉक केला. तसंच, स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. तसंच, अश्लील कमेंट करत महिलेचे विनयभंग केला.
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तसंच, तुला पाहून उत्तेजित होतो असं म्हणत पीडितेसमोर स्वतःचे कपडेदेखील उतरवत तिच्याशी असभ्य वर्तन केले. यानंतर पीडितेने आरडाओरडा करत तिथून स्वतःची सुटका करुन घेतली. मात्र, झालेल्या प्रकाराने ती खूपच घाबरली होती.
वरिष्ठ पोलिस अधिकारी दत्तात्रेय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला होता त्यानंतर विश्रांतीवाडी पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला. आम्ही आरोपीला नोटिस पाठवली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ओळखीच्या व्यक्तीने एसा विश्वातघात केल्याने महिलेला मोठा धक्का बसला आहे.