पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली पीएमपीएमएलची प्रवाश्यांसाठीची वाहतूक सेवा आजपासून सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात 421 बस 190 मार्गावर धावणार आहे. त्यात दहा वर्षाच्या आतील आणि 65 वर्षांवरील व्यक्तींना बस मध्ये प्रवेश नसणार आहे. त्यासाठी प्रत्येक बसस्टॉपवर बस सॅनिटायझ केली जाणार असून ५० टक्केच प्रवाश्यांना प्रवासाची संधी दिली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमपीएमएलच्या बससेवेला आजपासून प्रारंभ झाला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊननंतर आता बस प्रवासात प्रामुख्याने काळजी घेतली जाणार आहे. ही बससेवा सुरु करताना राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महापालिका प्रशासनाने दिलेल्या आहेत, त्या सर्व नियमांचं तंतोतंत पालन होणार असल्याची माहिती PMPLचे सीएमडी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली आहे. 


प्रवाशांना बसच्या बाहेर आणि आत सॅनिटायझरचा वापर करणं, मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे. बसमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत काळजीपूर्वक आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता या बससेवेला कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.