पुणे : Aryan Khan case : आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा ( NCB) साक्षीदार (NCB witness) किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Kiran Gosavi  NCB witness in Aryan Khan case, arrested by Pune Police)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार (NCB witness) किरण गोसावी (Kiran Gosavi ) याला पुणे पोलिसांनी अटक केल्याने याप्रकणी मोठी माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याच्या अटकेला दुजोरा दिला आहे. मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार  किरण गोसावी होता. त्याला फसवणूक प्रकरणात ही अटक झाल्याचे सांगितले जात आहे. आता त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.


किरण गोसावी बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासोबत एका सेल्फीमध्ये दिसला होता. जेव्हा NCBने ड्रग्ज पार्टीच्यावेळी क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी तिथे किरण गोसावी होता. तो या प्रकणातील प्रमुख साक्षीदार होता. किरण गोसावी यांच्यावर एनसीबीच्या दुसऱ्या एका साक्षीदाराने 25 कोटी रुपयांचा आरोप केला होता. प्रभाकर साईल याने किरण गोसावी याच्यावर पैशाचा आरोप केला होता. 



18 कोटी रुपयांचे डील करण्याचे ठरले. यातील 8 कोटी NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना द्यायचे होते. तसे संभाषण मी ऐकले, असा दावा प्रभाकर साईल यांने केला होता. शाहरुख खान याच्याकडून पैसे घेण्यासाठी कटकारस्थान होते. याचा भाग हा किरण गोसावी होता. या आरोपानंतर किरण गोसावी फरार झाला होता. तो उत्तर प्रदेश पोलिसांना शरण जाणार असे त्याने सांगितले होते. मात्र, त्याला आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 


2018 च्या फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी लुकआउट परिपत्रक जारी केल्यानंतर फरार झालेल्या गोसावीने महाराष्ट्रात आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. किरण गोसावीवर नोकरींच अमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण गोसावीविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण गोसीवाचा शोध घेताना पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला गेले होते. दरम्यान पुणे पोलिसांना अखेर यश मिळालं असून किरण गोसावीला ताब्यात घेण्यात आले आहे.