पुणे पोलिसांकडून डीएसके बिल्डरचा शोध सुरु
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. डीएसकेंकडून अद्यापही अटकपूर्व जामिनासाठई मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आलेला नाही.
पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांचा पुणे पोलीस शोध घेत आहेत. डीएसकेंकडून अद्यापही अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आलेला नाही.
पुणे सत्र न्यायालयाच्या आदेशाची अधिकृतप्रत मिळालेली नाही. त्यामुळं डीएसकेंकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारंच्या ठेवी बुडवल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला होता. त्यानंतर डीएसकें यांच्या वकिलांनी वरच्या न्यायालयात जाईपर्यंत अटक न करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्जही फेटाळण्यात आल्यामुळे डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पत्नीचा अटकपूर्व जामीन पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे डीएसके आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झालाय. मात्र, पोलीस अटक करतात का, याकडे लक्ष लागले आहे.