पुणे : पंक्चर काढण्याच्या निमित्तानं बसलेला आर्थिक भुर्दंड तसेच झालेला मनस्ताप सोमनाथ यांच्यासाठी खरोखरच संतापजनक आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची पोलिसात रीतसर तक्रार दिली आहे. मात्र पोलीस दुकानामध्ये पोचण्याआधीच इथला पंक्चरवाला दुकान बंद करून पसार झाला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंक्चरवाल्यांकडून होणाऱ्या लुटीचं हे प्रतिनिधिक उदाहरण आहे. यासंदर्भात सोशल मीडियात शोध घेतला असता पुणे परिसरात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचं निदर्शनास येतं. आपल्याकडे दुचाकी असो वा चारचाकी, बहुतेक वेळा टायर पंक्चर झाल्यानंतर एकापेक्षा जास्त पंक्चर्स आढळून येतात. कित्येक वेळा ट्यूब बदलण्याशिवाय पर्यायच उरत नाही. आणि अशा प्रत्येक वेळी आपल्या मनात शंकेची पाल जरूर चुकचुकते, पण आपण करू काहीच शकत नाही. महत्वाचं म्हणजे या पंक्चरच्या धंद्याचं रेकॉर्ड म्हणून असं काहीच उपलब्ध नसतं. पोलीस कारवाईलाही मर्यादा आहेत. अशावेळी आपलं आपणच सावध राहण्याची आवश्यकता आहे.