Pune Rail Accident : चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, प्लॅटफॉर्म आणि कोचमध्ये अडकला प्रवासी, आणि मग...
Pune Accident L पुणे रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालत्या ट्रेनमध्ये चढणे किती धोकादायक असते, ते पाहाच.
पुणे रेल्वे स्थानकावरील एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय रेल्वेने सोशल मीडिया हँडल X (ट्वविटरवर) रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या सुरक्षा जवानांच्या शौर्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ट्रेनची धडक बसली आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला. ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या तरुणाला पाहताच एक सुरक्षा कर्मचारी लगेच तिथे पोहोचतो. तत्परता दाखवत तो पटकन त्या तरुणाला स्वतःकडे ओढतो आणि त्याला वाचवतो.
स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ (मेडिकल सेन्स फ्रंटियर्स) कर्मचाऱ्यांच्या एका सदस्यानेही तरुणांना ट्रेनखाली जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना फलाटावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुणे रेल्वे प्रवासाचा व्हिडीओ
ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करताना, रेल्वेने लिहिले की, “पुणे स्थानकावरील गर्दीच्या वेळी, MSF कर्मचारी सदस्य दिगंबर देसाई यांच्या जलद कृती आणि धैर्याने उद्यान एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाला अपघात होण्यापासून वाचवले. प्रवासी सेवेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचा हा खरा पुरावा आहे.” 2 दिवसांपूर्वी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. 28 मार्च रोजी रेल्वेने हा व्हिडिओ शेअर केला होता.
दुसऱ्या पोस्टमध्ये, DRM पुणे यांनी प्रवाशांनी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंती केली आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. आतापर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अशा गैरवर्तणामध्ये अपघात होऊन जीव जाण्याचा धोका अधिक असतो.
प्रवास करताना काय काळजी घ्यावी?
रेल्वेच्या वेळी सुरुवातीलाच तपासून घ्या
रेल्वेच्या वेळेआधी 15 ते 20 मिनिटे अगोदर रेल्वे स्थानकावर पोहोचा
सामान फार घेणे टाळा आणि जास्त असेल तर मोजून घ्या
लहान मुलांची प्रवासात विशेष काळजी घ्या
वृद्ध व्यक्तींची प्रवासात विशेष काळजी घ्या
प्रवास करताना गडबड गोंधळ करु नका
धावत ट्रेन पकडणे टाळा अपघात होण्याची शक्यता असते.