Pune Bhide Bridge Underwater : पुण्यात पावसाने पुन्हा एकदा धुमशान घातले आहे.  पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने  खडकवासला, वरसगाव या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडकवासला धरणातून  मुठा नदी पात्रात 23 हजार 122 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे तर नदीपात्रातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये; खबरदारी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आला आहे.


पुण्याच्या राजगड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे विंझरमधील ओढ्यावरील पुल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे नसरापूर-वेल्हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळित झाली. 


रेड अलर्ट


पुढील 24 तासांत मुंबईसह उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा  हवामान विभागाने दिला आहे,  रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढील 24तासांत मुंबईसह उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. मुंबईत ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे.. त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावं असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. 
मावळच्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. सध्या पवना धरणातून 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होतोय. संततधार पाऊस सुरू असल्यानं नद्यांच्या पाणीपातळीतही प्रचंड वाढ झालीये. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.


अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात  जोरदार पाऊस झाला. तब्बल साडेतीन चार तास झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी साचलं.  लहान मोठ्या नद्यां तुडुंब भरून वाहू लागल्या. सीना नदीला पूर आल्यामुळे काही काळ नगर कल्याण महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवावी लागली.