Pune Crime : ``आता पोलिसातच तक्रार करेन``; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...
Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं.
Pune Girl Attack : पुण्यात यायलं तरी काय आहे. एकतर्फी प्रेमात दर्शना पवार (Darshana Murder Case) हिची हत्या झाली त्यानंतर आता पुण्यातील अजून एका तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रेम आंधळ असतं पण प्रेम हिंसक कधी झालं असा प्रश्न गेल्या काही प्रसंगावरुन पडायला लागला आहे. तरुण पिढीमध्ये ना नो हे शब्द पचविण्याची ताकद राहिला नाही का? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती फक्त आपलीच हीच भावना मनात ठेवून ही तरुण पिढी हिंसक कृत्य करत आहेत का? (Pune MPSC Girl Incident)
मंगळवारी दिवसाढवळा शंतनू लक्ष्मण जाधव या 22 वर्षीय तरुणाने जिच्यावर प्रेम करतो असं म्हणाऱ्या तरुणीचाच जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने दोन तरुणांच्या मदतीने त्या मुलीचे जीव वाचले. एकाच वेळी तरुणांचे दोन रुप पाहिला मिळाले. एका तरुणाने जीव घेण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने जीव वाचवला. (pune Sadashiv Peth Attack on girl with koyta mpsc student Shantanu Jadhav maharashtra crime news)
दुसरीकडे माथेफिरु शंतनूच्या तावडीतून सुटलेल्या आपल्या लेकीला पाहून तरुणीच्या आईने गहिवरली आहे. पण त्याचवेळी आईचा संतापही पाहिला मिळाला. मीडिया प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या की, शंतनू आणि माझी मुलगी एकाच महाविद्यालयात शिकत होते. अशा मनोरुग्ण लोकांना महाविद्यालयात अॅमिशनच द्यायला नको. अशा मनोरुग्ण लोकांना या जगात जगण्याचा अधिकाराच नाही. (maharashtra crime news )
हेसुद्धा वाचा - पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण
आईने शंतनू त्यांच्या मुलाली कसा त्रास द्यायचा हेसुद्धा सांगितलं. त्या म्हणाल्या की, आम्ही शंतनूच्या आई वडिलांना त्यांचा मुलीचे प्रताप फोन करुन सांगितले होते. त्याच्या वडिलांनी तुम्ही काळजी करु नका, मी बघतो त्याच्याकडे असं आश्वासनही आम्हाला दिलं होतं. पण सोमवारी शंतनूचा पुन्हा आमच्या मुलीला फोन आला आणि त्याने तिला धमकी दिली होती.
हेसुद्धा वाचा - ... म्हणून त्याने माझ्यावर कोयत्याने वार केला; पुण्याच्या तरुणीनेच सांगितलं नेमकं काय घडलं?
तेव्हा वेळी मी शंतनूला माझ्या मुलीला वारंवार फोन करायचा नाही. मी तुझी तक्रार पोलिसांत करेल, असं धमकावलं होतं. याच गोष्टीचा राग मनात घेऊन शंतनूने माझ्या मुलीवर प्राणघात हल्ला केला.