पुणे : पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील म्हसे इथं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडलीय. दुपारी लग्न लागलेल्या वधूचा त्याच दिवशी आकस्मिक मृत्यू झालाय. जयश्री मुसळे असं या नवविवाहितेचे नाव आहे. म्हसे इथल्या बबन मुसळे यांचा मुलगा हिरामण यांच्यासह जयश्रीचा थाटामाटात संपन्न झाला. लग्न लागल्यानंतर सुखी संसाराची स्वप्नं पाहत या जोडप्याने एकमेकांना प्रेमाचे घासही भरवले. यानंतर अक्कलकोटवरुन आलेले आई वडिल आणि पाहुणे आनंदाने परतीच्या मार्गाकडे निघाले. मात्र जयश्रीला अचानक  ताप आणि चक्कर येऊन त्रास होऊ लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सासरे बबन मुसळे आणि ग्रामस्थांनी तिला शिरुरला रुग्णालयात उपचारासाठी आणले. तिथे नेण्याआधीच जयश्रीची प्राणज्योत मालवली. जयश्रीच्या अंगावरील हळद अजूनही उतरलेली नव्हती. सुखी  संसाराची जयश्री आणि हिरामणनं स्वप्नही रंगवली होती. मात्र तिच्या अशा अचानक जाण्यानं वधू आणि वराच्या कुटुंबासह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.