धक्कादायक! आईने दुर्लक्ष केलं, मुलीने युट्यूबवर Video पाहून केली स्वत:ची प्रसूती
युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःची प्रसुती केल्याचा प्रकार पुण्यात समोर
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना पुण्यातील (Pune) किकटवाडी उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवेधावडे इथं बेवारस स्थितीत चिमुकली (New Born Baby) आढळली होती. त्या चिमुकलीच्या पालकांचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. युट्यूबवर व्हिडिओ (Youtube Video) पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःची प्रसुती करुन बाळाला फेकून दिल्याचं समोर आलं. संबंधित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी तिच्या आईनेही दुर्लक्ष केलं. मुलगीच्या गर्भपिशवीला सूज आल्याचं सांगून पोटात दुखत असल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं. अखेर मुलीनं युट्यूबवर पाहून प्रसुती केली आणि चिमुरडीला फेकून दिलं.
बाळावर सध्या उपचार सुरू आहेत. याबाबत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगी आणि एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली असून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.
काय आहे संपूर्ण घटना
कोंढवे धावडे परिसरमध्ये एक अल्पवयीन मुलगी आणि तिची आई अशा दोघीच रहतात. चार ते पाच महिन्यांपूर्वी मुलीचं पोट दुखत असल्याने आई मुलीला घेऊन एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी त्या मुलीची तपासणी केली. तेव्हा ती मुलगी गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी त्या मुलीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. पण या गोष्टीकडे मायलेकींनी दुर्लक्ष केलं. गर्भाच्या पिशवीला सूज आल्याने मुलीचे पोट दुखत असल्याचे मुलीच्या आईने शेजाऱ्यांना सांगितलं.
असा झाला उलगडा
काही दिवसांनी त्या परिसरात एक नवजात अर्भक आढळलं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याच दिवशी सोसायटीतल्या एका अल्पवयीन मुलीला दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना संशय आल्याने त्या मुलीकडे चौकशी केली. सुरुवातीला त्या मुलीने काहीही सांगण्यास नकार दिला. नंतर मात्र तीने आपलंच मुल असल्याची कबूली दिली.
याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने पोलिसांनी दिले आहेत.