Indapur Accident Video: पुण्यातील इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलमध्ये जेवण देण्यास नकार दिल्याने मद्यधुंदावस्थेतील एका कंटेनर चालकाने कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूरमधील हिंगणगाव येथील हा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.


मुद्दाम दिली धडक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरधाव वेगातील वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याजवळच्या एखाद्या हॉटेलला किंवा घराला धडक दिल्याच्या बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील. अशा अपघातांचे सीसीटीव्ही फुटेजही अनेकदा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र पुण्यातील इंदापूरमध्ये गणेश चतुर्थीच्या पूर्वसंख्येचा एक फारच विचित्र प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ मोबाईल कॅमेरामध्ये शूट करण्यात आला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


नेमकी कुठे घडली ही घटना?


मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना गोकुळ हॉटेल इथे घडली. मद्यपान करुन आलेल्या कंटेनर चालकाला हॉटेलमध्ये जेवण देण्यास नकार दिला गेला. त्यानंतर संतापलेल्या या कंटेरन चालकाने हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत पार्क केलेला कंटेनर यू-टर्न मारुन हॉटेलच्या दिशेने आणत हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वाराला धडक दिली. त्यानंतर पुढे जाऊन हॉटेलसमोर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीलाही त्याने धडक दिली. 


त्याला थांबवण्याचा प्रयत्न


MH 12 RN 4359 क्रमांकाच्या कंटेनरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॉटेल बंद असल्याने त्याने जेवण नाकारण्यात आलं होतं. मात्र आपल्याला जेवण दिलं जात नसल्याचा राग मनात ठेऊन चालकाने हॉटेलचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचा जेवण नाकारल्याने हा कंटेनरचालक पुढे निघून जाईल असं वाटलं होतं. मात्र तो संतापून कंटेनर थेट हॉटेलवर घेऊन आला. हॉटेलमधील कर्चमारी आणि इतर लोक या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मध्यपान केल्याने चालक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याने अनेकदा हॉटेलला धडक दिली. त्यानंतर अखेर हॉर्न वाजवत तो एकाच जागी थांबून आपलं म्हणणं सांगू लागला.



सर्वसामान्यांचा जीव धोक्यात


या प्रकरणामध्ये पोलीस तक्रार करण्यात आली असून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र हा सारा प्रकार रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोठी वाहनं चालवणाऱ्यांमुळे कशाप्रकारे इतरांचा जीवही धोक्यात घालू शकतात याची झलक दाखवणारा आहे, अशी चर्चा आहे. हाच चालक अशा मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर कंटेरन चालवत असता तर अधिक मोठा अनर्थ झाला असता.