स्वामी मकरंदनाथ यांच्या एकसष्टीपूर्ती निमित्त पुण्यात सोहळा
स्वामी मकरंदनाथ यांचा एकसष्टीपूर्ती सोहळा पुण्यात पार पडला.
पुणे : स्वामी मकरंदनाथ यांचा एकसष्टीपूर्ती सोहळा पुण्यात पार पडला. झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. स्वामी मकरंदनाथ यांच्या एकसष्टीपूर्ती निमित्त तीन दिवसांच्या साधना शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी सुरुवात झालेल्या या साधना शिबीराची सांगता, रविवारी संध्याकाळी जाहीर कार्यक्रमानं झाली. सर परशुराम भाऊ महाविद्यालयात हे तीन दिवसांचं साधना शिबीर पार पडलं. स्वामी मकरंदनाथ यांनी विशुध्द अध्यात्माचा प्रसार केलाय. ते अंत्यत साधं, सरळ आणि पारदर्शी व्यक्तिमत्व आहे. अशा भावना व्यक्त करत, सर्वांना आत्मबोधाचा पाझर फुटो अशा सदिच्छा विजय कुवळेकर यांनी यावेळी दिल्या.