पुणे : १५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ५९४५ प्रवासी पुणे विमानतळावर उतरले. त्यांचे ट्रॅकिंग सुरू आहे. दहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. आज नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या २४ तासात २३ सॅम्पल पाठवले ते सगळे निगेटीव्ह आल्याचे यावेळी सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आदेशाची अंमलबजावणी


शाळा, कॉलेज, जिम, स्विमिंग टेंक बंद ठेवण्याचा आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शाळा कॉलेजला सुट्या दिल्या आहेत. याचा अर्थ त्यांनी कुठेही फिरायचे नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कॉलेजची होस्टेल रिकामी करण्याबतच्या सूचना आम्ही दिलेल्या नाहीत. तो निर्णय संबंशीत संस्थांनी घ्यावा असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. 


कोरोनाची जगात दहशत दिसून येत आहे. जगात लाखो लोक या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. तर ४००० पेक्षा जास्त लोकांचा आतार्पंयत मृत्यू झाला आहे. देशातही ८०च्या घरात बाधा झालेल्यांची संख्या गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातही १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय घेण्याचे आवाहन आरोग्या विभाग आणि राज्य सरकारने केले आहे.