अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी येथे इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅरेथॉनच्या प्रमोशनसाठी पुण्यामधून आठ सायकल रायडर्सनं पुणे ते शिर्डी सायकल रॅली आयोजित केलीय. ही रॅली पुण्यातून निघाली असून अहमदनगरमध्ये तिचे आगमन झाले आहे.


या रॅलीत एकूण आठ सायकल रायडर्स सहभागी झाले आहेत. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी गाडीऐवजी सायकलचा वापर करावा असा संदेश, या रॅलीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या सायकल राईडर्सनं दिलाय.