पुणे : सोमवारपासून पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3 वाजता पालकमंत्री अजित पवार पुणे शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कौन्सिल हॉल इथं होणाऱ्या या बैठकीत पुण्यातील निर्बंध शिथिल शिथिल करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. (Pune Unlock: Restrictions in Pune likely to be relaxed from Monday) मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे.  शनिवार तसेच रविवार दुकानं पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश आहेत. खरंतर पुण्यातील पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांच्या खाली आहे.  असं असताना पुण्यात दुपारी 4 वाजताच दुकाने बंद करावी लागतात.  याविरोधात व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे.


पुण्यात किमान सायंकाळी 7 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी असावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलन देखील पुकारलं आहे। भारतीय जनता पक्षाने देखील व्यापार्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं होतं.  अशा सगळया परिस्थितीत व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची मानसिकता पालकमंत्री अजित पवार यांनी देखील दर्शवली होती.  मात्र त्याबाबातचा निर्णय होऊ शकलेला नाही आहे. खरतर प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी पालकमंत्री अजित पवार कोरोना पतिस्थितीचा आढावा घेतात.  यावेळी मात्र ही बैठक रविवारी होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे. 


मुंबई पाठोपाठ आता पुण्यात देखील सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार असल्याच म्हटलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पुणे निर्बंधाबाबत शनिवारी चर्चा केली आहे.