पुणे हिंसक आंदोलन, १८५ जण पोलिसांच्या ताब्यात
आंदोलनादरम्यान पुण्यात ७ पोलीस जखमी
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनात पुण्यात काल हिंसक पडसाद दिसून आले होते. महाराष्ट्र बंद आंदोलना दरम्यान हिंसक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या १८५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुरुवारच्या हिंसक आंदोलनातील चांदनी चौक दगडफेक प्रकरणी ८३ जण, जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड प्रकरणी ५ महिलांसह ७६ जण तर डेक्कन येथे रास्तारोको करणाऱ्या २१ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बंडगार्डन तसेच कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
कालच्या आंदोलनादरम्यान पुण्यात ७ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. आंदोलनकर्त्यांपैकी १ मुलगी किरकोळ जखमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कक्षाचे नुकसान झाले आहे. एसटी तसेच पीएमपीएल बंद ठेवावी लागल्याने सुमारे १ कोटी ७५ लाखांचे नुकसान झाले आहे.