पुणे :  पुणेकरांना यापुढे पाण्याचा वापर जरा जपूनचं करावा लागणार आहे. पाण्या संदर्भात थोडी चिंताजनक बातमी पुणेकरांसाठी येत आहे.  पुणेकरांवर पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्याची महापालिकेने केलेली मागणी जनसंपत्ती नियमन प्राधिकरणाने फेटाळली आहे. धक्कादायक म्हणजे पुणे शहराला दररोज केवळ ६५० एमएलडी एवढाच पाणीपुरवठा जलसंपत्तिनियमन प्राधिकरणाकडून मंजूर झाला आहे. पुणे शहराला सध्या दररोज १३५० एमएलडी पाणी मिळतं. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयामुळे हा पाणी पुरवठा थेट निम्यावर येणार आहे.


मापदंडानुसार पाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या निर्णया नंतर पाणी पुरवठा थेट निम्यावर येणार आहे. अशा परिस्थितीत पुण्यावर मोठे पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.


पुणे शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात तसेच पाणी वापराच्या मापदंडानुसार पाणी देण्यात यावे अशी मागणी बारामतीतील विठ्ठल जराड या नागरिकाने केली होती. त्यावर गुरूवारी मुंबईत सुनावणी झाली.