पुणे : या घटनेते पुण्यातील पाषण टेकडीजवळील सुसखिंडीत रात्री सव्वा आठच्या सुमारास प्रेमीयुगूलाला लुटलंय, मारहाण केलीय. एवढ्या रात्री अशी ठिकाणं असुरक्षितच, त्यात पाषाण टेकडीवरील सूसखिंडीत हे प्रकार जास्त होतात, हे या जोडप्याने ध्यानात घेतलेले दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे चोरही जास्त हुशार नाहीत, कारण त्यांनी फोन पे द्वारे या जोडप्याकडून जबरदस्तीने ७६ हजार रुपये ट्रान्सफर करत, आपण कोण हा पुरावा देऊन ठेवला आहे. त्यामुळे पोलीस त्यांना लवकरच ताब्यात घेतील अशी शक्यता आहे.


वरील प्रकरणात तरुण आणि त्याची मैत्रिण एकांतात बसले होते, तुम्ही कोण काय कुठले असं विचारत मारहाण केली, युवकाच्या मोबाईलमधून ४० तर त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलमधून ३६ हजारांची त्यांनी ऑनलाईन ट्रान्सफरने लूट केली, या प्रकरणी २५ वर्षीय युवकाने सप्तश्रृंगी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.


सुसखिंडीत येणाऱ्या जोडप्यांना लुटण्याचे प्रकार सर्रास होत आहेत, मागील वर्षी देखील पिंपरी चिंचवडमधील फिरायला आलेल्या जोडप्याला तीन जणांनी बेदम मारहाण करत लुटलं होतं.या जोडप्याकडून १ लाख रुपयांचा ऐवज लूटला होता. याप्रमाणे एप्रिल २०१९ मध्ये एका तरुणाला पोलीस असल्याचं सांगत लुटलं होतं.