हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : 'PubG' या गेमच्या जाळ्यात तरूण त्याचप्रमाणे लहान मुलं देखील अडकली आहेत. तर आता अजित पवार नावाचा एक तरूण  'PubG'मुळे चक्क मनोरूग्ण झाला. अजित पवार म्हटल्यावर आपल्याला धक्का बसला असेल परंतु हे अजित पवार राजकारणातील अजित पवार नसून पुणे जिल्ह्यातील चाकण मध्ये सध्या वास्तव्यास असलेला एक उच्चशिक्षित तरुण आहेत. तो मुळचा माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावचा रहिवासी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महाशयांना  'PubG' गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पब्जी गेममध्ये दिल्या जाणाऱ्या कमेंट्सचा वापर या अजित पवारांनी आपल्या सामान्य आयुष्यात केला. या तरूणाने चक्क चाकणच्या रस्त्यावरती जाऊन  'PubG' गेम मध्ये येणारे कमेंट नागरिकांवर वापरले. त्यामुळे पब्जी गेमने अजित पवारांचे मनोधैर्य खचले असून ते आता मानसिक मनोरुग्ण झाले आहेत.



देशात सध्या ब्लू वेल, ब्लॅक पॅंथर यांसारख्या गेममुळे अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याने आता सरकारने पब्जी गेम वर्ती ही काहीतरी निर्बंध घालण्याची गरज निर्माण झाली असून येत्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकार अशा गेम वरती काय निर्बंध घालतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे..


परिणामी, आजच्या स्मार्ट जगात तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचे फायदे आज प्रत्येकाला होत आहेत. पण याचा वापर किती करावा, कसा करावा की मनोरूग्ण होईपर्यंत करावा हे फक्त आपल्या हातात आहे. त्यामुळे घरात मुलं किती मोबाईलचा वापर करतात आणि कशासाठी करतात याकडे पालकांचे लक्ष हवं.