Ratnagiri Crime News :  वर्षभरापूर्वी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमातून पंजाबमधील तरूणीनं थेट रत्नागिरी गाठली. पण, रत्नागिरीमध्ये येताच आपली फसवणूक झाल्याची बाब या तरूणीच्या लक्षात आली. दोनच दिवसांपूर्वी झालेला संपूर्ण प्रकार तरूणीनं प्रसारमाध्यामांसमोर येत उघड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण, पंजाबहून रत्नागिरीला आलेली तरूणी संबंधित तरूणाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून फोन करत होती. सोशल मीडियावर त्याला मेसेज करत होती. पण, रिप्लाय मिळत नव्हता. शिवाय, उचलला गेलेला फोन कुणा भलत्याच तरूणीनं उचलल्याचा दावा देखील या तरूणीनं केला आहे. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर कुठंतरी नोकरी शोधून पैसे कमवायचे आणि घरी परत जायचं या इराद्यानं तरूणीनं नोकरीचा शोध सुरू केला. पण, त्याचवेळी मोबाईल दुकानातील दुकानदारानं या तरूणीची सारी चौकशी केली. त्यानंतर सारा प्रकार समोर आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरूणीच्या घरच्यांशी संपर्क केला. दरम्यान, तरूणी तिच्या पंजाबमधील मोहाली येथील गावी परतली आहे. तर, तरूणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याबाबतचा शोध देखील सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या


नवी मुंबईतील सीवूडसमध्ये प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण  समोर आलंय.. .पोलिसांच्या तपासणीदरम्यान भांडणातून हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय.. प्रेयसीचा गळा दाबून , डोक्यात दगड मारुन हत्या केल्यानंतर स्वत: देखील खाडीमध्ये उडी टाकुन प्रियकराने आत्महत्या केली.. खाडीमध्ये मासेमारी करणा-या मच्छिमारांना प्रेयसीचा मृतदेह आढळुन आला होता... तर प्रियकराचा मृतदेह तपासणी दरम्यान पोलिसांना आढळला..