अमरावती : कोरोनामुळे मागील गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यातील शाळा येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्यानंतर आता वर्ग ९ वी ते ११ वी पर्यतच्या शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आलेल्या शिक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक बाब म्हणजे महिला शिक्षिकांनी सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहे. परंतु कोरोनाचे सर्व नियम व निकष पाळून येत्या २३ तारखेपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा या सुरू होणार आहे. दरम्यान शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांची कोरोना चाचणी करून घेणे अनिवार्य आहे.


त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात शिक्षकांनी आज त्यांची कोरोना चाचणी करून घेण्यासाठी लांब लांब रांगा लावल्या होत्या. परंतु यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.