बुलडाणा : चिखली तालुक्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडलेत. धोत्राभनगोजी इथे एका शाळेच्या आयएसओ मानांकनासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपच्या श्वेता महाले यांनी भाषणातून एकमेकांवर टीका केली. यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि जोरदार हाणामारी झाली. या सगळ्या प्रकारानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. 


घटनास्थळी दोन्ही पक्षाचे हजाराहून अधिक कार्यकर्ते जमा झाले होते. आक्रमक झालेल्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिखलीतील राजकारण चांगलंच तापले आहे. काँग्रेसचे आमदार राहुल बोंदे आणि महिला बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद जिल्हाभर उमटण्याची भीती व्यक्त होत आहे.