बुलडाणा : चिखलीमध्ये दुय्यम उपनिबंधकांच्या कार्यालयात मनसेने राडा केला. शेतकऱ्यांना खरेदी खत करण्यासाठी रजिस्टर कार्यालयात जावे लागते. मात्र येथील दुय्यम उपनिबंधक अधिकारी शेतकऱ्यांना त्रास देत होता. या त्रासाला शेतकरी कंटाळले होते. याबाबत मनसेने आवज उठविण्याचा निर्धार केला. यावेळी अधिकाऱ्यांने माहिती न देता उडवा उडवीची उत्तरे दिल्याने चोप दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचा आराप शेतकऱ्यांनी केला आहे. याचा जाब विचारण्यासाठी मनसैनिक दुय्यम उपनिबंधकांच्या कार्यालयात गेले. मात्र संबंधित अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यानं मनसैनिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला. या राड्यानंतर एकच चर्चा सुरु झाली.


 संतप्त मनसे कार्यकर्ते चिखली येथील खरेदी विक्री कार्यालयात जमा झालेत. यावेळी मनसेचा राडा घातला. शेतकरी तसेच प्रॉपर्टी खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून निबंधक पैसे मागत असल्याने मनसेने हा राडा घातला.