मुंबई : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले आहे. वडीलांच्या विरोधात जाऊन आपल्याला निर्णय घ्यावा लागल्याचे सुजय यांनी सांगितले.  माझ्या वडीलांच्या इच्छेविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपात येण्याची ही भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. वडिलांसोबत काही बोलणे झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आता वडिलांनी फोन करुन आपल्याला सल्ला दिल्याचे सुजय विखे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख आहे मात्र माझ्या भाजपा प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय म्हणाले. जे काही करशील ते सांभाळून कर असा वडिल म्हणून त्यांनी मला सल्लादिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय म्हणाले. 


सुजय यांच्या भाजपा प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे यांना कोंडीत धरण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. वडिलांच्या अडचणी वाढण्याचा प्रश्न नाही,  पक्षाने राजीनामा मागितला, किंवा जे काही पक्ष सांगेल ते करायला तयार आहोत हे वडिलांनी आधीच स्पष्ट केले असल्याचे सुजय विखे पाटीलांनी म्हटले आहे. 


इतर कुणी काही मागणी करायचा आणि सांगायचा काही अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. विखे कुटुंबाला काँग्रेसने खूप काही दिले, त्यांच्या सगळ्या अपेक्षाही पूर्ण केल्या. सुजयच्या भाजपा प्रवेशानंतरही आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा न देण्याची भूमिका राधाकृष्ण यांनी घेतली आहे. त्यांनी काँग्रेसबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी असेही बाळासाहेब थोरात म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर सुजय यांनी हे वक्तव्य केले. 


'रोज एक घराणे भाजपात'


दररोज एक एक घराणे भाजपात येईल, असे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आज उत्तर महाराष्ट्रामधले एक घराणे भाजपात आलेले पाहायला मिळेल, परवा सोलापुरातले घराणे भाजपात येईल, असेही  पाटील पुढे म्हणाले.