नांदेड :  Girl Ragging News : मुलीवर रॅगिंग ( Girl Ragging) केल्याप्रकरणी 3 मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील ही घटना आहे. तसेच शिक्षकावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाच्या समर्थनार्थ विद्यार्थी पोलीस स्टेशनवर धडकले आहेत. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. (Ragging at Nursing College in Nanded, FIR registered against 3 girls)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर महाविद्यालयातील तीन मुलींनी रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रॅगिंगची तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर शिक्षकाने छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.


हदगाव येथील एका नर्सिंग महाविद्यालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठवडाभरापूर्वी येथे 19 वर्षीय मुलीने प्रवेश घेतला होता. ही मुलगी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. 12 सप्टेबर रोजी वसतिगृहातील तीन मुलींनी या मुलीवर रॅगिंग केले. रॅगिंग करताना तिला कपडे काढायला लावले. नाक घासायला लावले तसेच झाडू मारण्यास सांगितला. 


दरम्यान, रॅगिंगबाबतचा हा प्रकार शिक्षकाला सांगायला गेली असता त्यांनी मुलीची छेड काडल्याचा आरोप मुलीने फिर्यादीत केला आहे. त्यावरून हदगाव पोलीस स्टेशनमध्ये रॅगिंग केल्याप्रकरणी तीन मुलींविरोधात तर छेडछाड केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर नर्सिंग महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी हदगाव पोलीस स्टेशनवर धाव घेतली. 


महाविद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारच्या रॅगिंगचा प्रकार घडला नसून शिक्षकावरही चुकीचा आरोप करण्यात आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यानी दिली. दरम्यान पीडित मुलीची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.