Rahul Gandhi on Savarkar : कॉंग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या पदयात्रेनिमित्त कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनायडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय. राहुल गांधी एका सभेत सावरकरांवर आरोप केले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून (BJP) महाराष्ट्रभर विरोध सुरु झालाय. काही ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 


महाविकास आघाडीची फारकत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेही (Shivsena) या वक्तव्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली नाराजी व्यक्त करत आपण सावरकरांचा आदर करतो, असे म्हटले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेही (NCP) राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत असे बोलायला नको होते, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली आहे.


हे ही वाचा > > राहुल गांधींच्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते - संजय राऊत


राहुल गांधींनी राजकारण करु नये - छगन भुजबळ


"निवडक स्वातंत्र्यवीर सावरकर घेण्यापेक्षा त्यांचा संपूर्ण अंगीकार करायला हवा. राहुल गांधी यांनीही याबाबत बोलायला नको होते. त्यांचा मूलभूत समस्यांवर फोकस असायला हवा. त्याचे राजकारण करू नये. मी तेवढा मोठा नाही आणि त्यांच्यासोबत अनेक जेष्ठ आहेत," असे छगन भुजबळ यांनी म्हटले.


Bharat Jodo Yatra: 'तुमचा नोकर...' सावरकरांचं हे पत्र देवेंद्र फडणवीसांनीही पाहावं म्हणत राहुल गांधींची टीका


सावरकरांची बदनामी शिवसेना सहन करणार नाही - संजय राऊत


"आपल्या देशात तक्रारी दाखल करणं आणि त्याच्याआधारे प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग झालाय. काल उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलय की, वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारची बदनामी शिवसेना सहन करणार नाही. त्यामुळे हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयांवर त्यांची भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची आवश्यकता नव्हती. यामुळे शिवसेनेसह कॉंग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. इतिहासात काय घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास घडवावा या मताचे आम्ही आहोत." राहुल गांधी यांनी त्याकडे लक्ष द्यावे, असे संजय राऊत म्हणाले.