प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी  : तुम्ही जर विविध आकर्षक कंपन्याच्या मोबाईलचे शौकिन असाल तर हि बातमी जरूर पहा... सध्या बाजारात मोबाईलचे बनावट साहित्य विकलं जातंय... होय रत्नागिरीत सध्या मोबाईल मार्केटमध्ये बनावट साहित्य विक्री करणाऱ्या तीन दुकांनावर पोलिसांनी छापा मारलाय... या छाप्यात बनावट मोबाईलच्या बॅटरीसह फ्लीप कव्हर असा लाखांचा माल जप्त करण्यात आलाय. पाहूया या मोबाईलच्या साहित्याच्या बनवेगीरी करणाऱ्यांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात ब्रॅडेड मोबाईल कंपन्यांच्या साहित्य खरेदीसाठी जाताय मग जरा सावधान...कारण सध्या बाजारात तुमच्या माथी बनावट मोबाईल कंपन्याचे साहित्य मारले जावू शकते... होय रत्नागिरी आणि चिपळूण मध्ये असा प्रकार उघड झालाय. इन्टेक्स कंपनीतील अधिकाऱ्यांना रत्नागिरी आणि चिपळूणच्या मोबाईल मार्केटमध्ये बनावट साहित्य विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्या... त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे मार्केटचा आढावा घेतला... त्यावेळी रत्नागिरीच्या आठवडा बाजार परिसरातल्या मार्केटमध्ये काही दुकानात इन्टेक्स कंपनीच्या नावावर बनावट साहित्यांची विक्री होत असल्याचं समजलं... त्यानुसार त्यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार दिली. रत्नागिरी शहर पोलिसांच्या मदतीने छापेमारी करताना आठवडा बाझार परिसरातल्या तीन दुकानात इन्टेक्स कंपनीचे मोबाईल कंपनीच्या नावावर बनावट साहित्य विक्री करत असल्याचे आढळून आल्याचे रत्नागिरी पोलीस उपनिरीक्षक विक्रमसिंह पाटील यांनी सांगितले. 


शहरातील आठवडा बाजार परिसरातल्या खेतेश्वर मोबाईल, महालक्ष्मी मोबाईल आणि नागनेशी मोबाईल या दुकानात १ लाख ६५ हजारांची इन्टेक्स कंपनीची बनावट साहित्य आढळून आली... दुकानात केलेल्या छापेमारीत मोबाईल बँटरीचे १८ नग,इटेक्स बँटरीचे १५ नग,१०९ फ्लिप कव्हर जप्त करण्यात आले आहे चिपळूणमध्ये देखील अशीच कारवाई पोलिसांनी केलीय..अत्यंत हुशारीनं इन्टेक्स कंपनीच्या नावावर ही साहित्यांची विक्री केली जात होती.  इंटेक्स कंपनीच्या शोरूम खेरीज यांची विक्री होत नाही त्यामुळे या छापेमारीतून हा सारा बनाव उघड झालाय..  


या प्रकरणी दुकान मालक बगतराम पुरोहित, हसरनराम पुरोहित आणि महेंद्रसिंग राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय... या तीन दुकानांवर कारवाई झाली.. सर्रास अनेक दुकानात मोबाईल कंपनीच्या नावावर बनावट साहित्याची विक्री खुलेआम होते आहे... त्यामुळे सर्वसामान्यांनी असे साहित्य खरेदी करताना जरा जपून खरेदी करा...